Saturday, December 3, 2016

शुन्यातून पूर्णता


आई वडिलांच्या कधी भांडण्यात
 तर कधी 'करिअर' मध्ये हरवलेल्या  बालमनाचा एकटेपणा
शाळेत 'कूल' मुलांच्यामध्ये नसण्याचा एकटेपणा
एकटेपणा 'लाईफ पार्टनर' न मिळण्याचा
एकटेपणा 'लाईफ पार्टनर' असूनही 'लाईफ' गमावण्याचा
एकटेपणा बालकांचे हास्य कधीच न ऐकलेल्या भिंतींचा
एकटेपणा घरट्यातून उडून गेल्याला पिलांच्या आठवणींचा
एकटेपणा रिकाम्या घराचा
भरलेल्या घरांत आसूनही दाटून येणारा एकटेपणा
आई वडीलांचे छात्र गमाविण्याचा एकटेपणा
'लाईफ पार्टनरच्या' परतीच्या प्रवासाचा एकटेपणा
कोणी समजून न घेतल्याचा एकटेपणा
कोणी बोलायला नसल्याचा एकटेपणा
कोणी आसूनही नसल्याचा एकटेपणा
एकटेपणा चुके कोणास ?
जीवनाच्या कुठल्यातरी टप्प्यावर
गाठे  सर्वांनाच

मनात..
 कुठलीतरी पोकळी प्रत्येकाच्या
 कुठलेतरी अपुरे प्रेम प्रत्येकाच्या
 कुठलातरी अपेक्षाभंग प्रत्येकाच्या

 त्यामुळे बिघडलेली नाती
 खिन्नता मन खाती
 अंतरी पोकळ छाती
 श्रम-कष्ट का सारे माती-माती ?

सखा-सखी तर नाद-छंद कधी भटकंती
मन रमवी  काही क्षणे
परि अजुनी शुन्यात, जीवन उणे
कैशी लाभे मनःशांति?

एकचं तो परमेश्वर मनुष्यावर आफाट प्रीति ओतुनी
स्वतःच यज्ञ मांडून स्वतःचीच आहुती देऊनी
तारायला झुके। नम्र वाकुनी
कुशीत घेण्यास उभा हात पसरुनि ।
जरि सर्व सृष्टिचा मालक असे ।

विदीर्ण ह्रदयावर त्याचीच फुंकर
विस्कटलेल्या मनावर त्याची नजर
विसावा, हळुवार स्पर्श
मिटवी सारे संघर्ष
जख्मी मनी हर्ष
खुलवी जिवंत पाण्याचे झरे ।
परि नको त्यास हार-तुरे ।

दारि उभा तो तुझ्या ह्रिदयाच्या
ज्याला कान आहेत त्याने ऐकावे
त्याचे यज्ञ स्वीकारावे
मग ह्रिदई  चिरे, घाव उणे
तसे त्याचे जीवन पणे
तंव दुःख, अपमान, अन्याय जाणे
देई परमेश्वर खरा आणि जिवंत
मनुष्य-बुद्धि पलिकडली शांत ।
वर अनतंकाळ जीवन मिळे ।

गर्व स्वतःच्या ज्ञानावर, अभिमान स्वतःच्या कर्तृत्वावर
बाळगुनी गमावू नका क्षमा निरंतर
नाकारू नका हा नम्र , प्रियकर परमेश्वर ।।